‘गांधीवादी राज्यघटना’ कशी असली असती? औंध संस्थानाचा प्रयोग काय सांगतो?
२३ नोव्हेंबर १९३८ रोजी राजा भवानराव पंतांनी आपलं सिंहासन सोडलं आणि घोषित केलं – ‘माझी प्रजा’ आता स्वतःचं कार्य सांभाळण्यास सक्षम झाली आहे. मी आता फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं व मार्गदर्शनाचं काम करेन.’ आता एकच समस्या होती. औंध प्रशासन स्वतःचा कारभार स्वतः कसा करेल? यावेळी औंधमधील नेत्यांनी सर्वसंमतीनं एका व्यक्तीच्या मदतीची अपेक्षा केली, ती म्हणजे महात्मा गांधी.......